WordPress.org

News

सर्व मराठी वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांचे (यूज़र्स) हार्दिक अभिनंदन!

सर्व मराठी वर्डप्रेसच्या वापरकर्त्यांचे (यूज़र्स) हार्दिक अभिनंदन!


आपण केलेल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल धन्यवाद! हे पोस्ट आपले आभार मानण्याच्या उद्देशाने प्रकाशित केले आहे. तुम्ही केलेल्या अमुल्य योगदानामुळे आम्ही वर्डप्रेसच्या तीन आवृत्ती (४.५, ४.५.१, आणि ४.५.२) चे पूर्ण अनुवाद केले आहेत. अजून आपले काम संपलेले नाही आहे, या अनुवादामध्ये आणखी सुधार अपेक्षित आहेत, आणि आम्ही ते तुमच्या सहकार्याशिवाय नाही करू शकणार. कुठलीही सुधारणा, व्याकरणात चूक आढळुन आल्यास, आमच्या लक्षात आणून द्या.

आपण स्वतः व आपल्या मित्रंना वर्डप्रेसच्या मराठी आवृत्तीबद्दल नक्की सांगा, आणि वापरण्याचा सल्ला जरूर द्या. आपण वर्डप्रेसची मराठी आवृत्ती येथून डाऊनलोड करू शकता.

मराठीचा वर्डप्रेस मध्ये प्रचार व प्रसार होण्यास आपला हातभार लावावा ही विंनंती. सहकार्य करण्यासाठी wordpress.slack.com किंवा maiboli.slack.com ला भेट द्या, किंवा येथे संपर्क करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा