गुटेनबर्ग स्ट्रिंग्स बद्दल (Regarding Gutenberg Strings)

नमस्कार मंडळी,

सर्वांना होळी सणाचा हार्दिक शुभेच्या.

जस आपण सर्व जाणता, वर्डप्रेस ५.४ च्या Strings अनुवादन करीता तयार आहेत. काही नवीन strings आहेत ज्यांचे अनुवादन करावयाचे आहे. त्या दृष्टीने सर्वजण आपल्यापरीने कार्यरत आहेत.

एक गोष्ट अनुवादन मान्य करतांना लक्षात आली आहे, ती अशी की:
“प्रत्येक गुटेनबर्ग ब्लॉक dummy strings वापरतोय, काही अनुवादक त्याचा Google Translation submit करीत आहेत. ज्याचा काही अर्थ नाही बनत.”

जसे खालील screenshot मध्ये झाले आहे.

“Etiam et egestas lorem. Vivamus sagittis sit amet dolor quis lobortis. Integer sed fermentum arcu, id vulputate lacus. Etiam fermentum sem eu quam hendrerit.”

वरील वाक्यातील शब्द हे लॅटीन भाषेत आहेत. अश्या वाक्यांचे आपण काय करावे हा प्रश्न आहे.

  • या वाक्यांना देवनागरी मध्ये लिहू नये.
  • त्या बदल्यात काही गद्य किंवा काही ओव्या लिहाव्या
  • त्या बदल्यात सरळ शब्दात “हे Dummy वाक्य आहे, हे बदला!” असे काही लिहावे?

या बद्दल आपले मत comments मध्ये व slack मध्ये कळवावे.