वर्डप्रेस मराठी भाषांतर स्प्रिंट्ससाठी प्रस्ताव

वर्डप्रेस मराठी भाषांतर स्प्रिंट्ससाठी प्रस्ताव

स्प्रिंटचे आयोजन:

  • स्प्रिंट 1: २५ डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५
  • स्प्रिंट 2: १९ जानेवारी २०२५ ते १ फेब्रुवारी २०२५

सामुदायिक बैठकीचे आयोजन:

  • बैठक 1: ११ जानेवारी २०२५, वर्डकॅम्प कोल्हापूर
  • बैठक 2: २ फेब्रुवारी २०२५, वर्डकॅम्प पुणे

उद्दिष्टे:

  1. WordPress.org, प्लगिन्स आणि थीम्सचे मराठीत भाषांतर पूर्ण करणे.
  2. वर्डप्रेस मराठी संघामध्ये नवीन योगदानकर्त्यांना जोडणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे.
  3. विद्यमान भाषांतरांसाठी अधिक सुसंगतता आणण्यासाठी शब्दकोशाचा विकास करणे व सुधारणा करणे.

सहभागासाठी आमंत्रण:
स्प्रिंट 1 मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया नोंदणी करा:
https://translate.wordpress.org/events/2024/marathi-wordpress-translation-sprint-1/

पहिले दोन स्प्रिंट्स प्रायोगिक तत्वावर केल्यानंतर पुढील स्प्रिंट्सचे नियोजन करण्यात येईल.